कृषी कायदे पुन्हा आणले तर…; राहुल गांधींचा केंद्राला रोखठोक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू शकतो असा सूचक संदेश दिला होता त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. कृषी कायदे पुन्हा आणलेत तर देशाचा अन्नदाता सत्याग्रहाचा मार्ग अवलंबेल असा इशारा राहुल गांधी यांनी दिला

याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, देशाच्या कृषिमंत्र्यांनी मोदीजींच्या माफीचा अपमान केला आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. पुन्हा कृषी विरोधी पावले उचलली तर देशाचा पुन्हा अन्नदाता सत्याग्रह करेल. तुमच्या अहंकाराचा पराभव पूर्वीही झाला होता आणि आताही होईल असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला.

केंद्रीय कृषिमंत्री नेमकं काय म्हणाले

नागपूर येथील एका कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी कायद्यावर भाष्य केलं. केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले. पण सरकार निराश नाही. शेतकरी आपल्या भारताचा कणा आहेत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे येऊ असे म्हणत, भविष्यात मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा परत येऊ शकतात असे संकेत नरेंद्र सिंग तोमर यांनी दिले.