हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. राजीव सातव यांची तब्येत खालावल्याचं कळताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉक्टरांना फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं कळतंय. राजीव सातव हे राहुल गांधींच्या अगदी जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात.
काही दिवसांपूर्वी राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विट द्वारे सांगितलं होतं. दरम्यान आता त्यांच्या प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्यात येणार का याकडेही लक्ष आहे.
राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.