शेवटी आज मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच; काँग्रेसने साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजारांवर पोहोचल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे . तर दुसरीकडे कोरोना लससाठ्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत असून, लसीचा कुठेही तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांना आता महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘शेवटी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तथा मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच! अपेक्षेप्रमाणे आणि आजवरच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांनी आपल्या नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्यांच्या खासकरुन बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायला सुरवात केली आहे’, असा पलटवार महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलाय.

आपल्या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लसीकरणाची आकडेवारी देताना जाणीवपूर्वक महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाब या बिगर भाजप शासित राज्यांची सविस्तर आकडेवारी दिली. पण हे करत असतानाच इतर भाजप शासित राज्यांची विस्तृत आकडेवारी देण्यास ते जाणीवपूर्वक विसरले!’ असा टोलाही महाराष्ट्र काँग्रेसनं लगावला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment