देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय ; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामीवर घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी यावेळी केली.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रं देत होते. त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे, असा हल्ला सोनिया गांधी यांनी चढवला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसात गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगलं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

एका आठवड्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. आगामी अधिवेशन अर्थसंकल्पी असले, तरी जनहिताच्या मुद्द्यांवरही चर्चा होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, ते पाहायला हवे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक मेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment