त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यातील ठाकरे सरकारबाबत एक अनोखी भविष्यवाणी केली आहे. ती म्हणजे ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार आहे. राणेंच्या या भविष्यवाणीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. “भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही, असा टोला पटोले यांनी राणे यांना लगावला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज जी काही भविष्यवाणी केलेली आहे त्याबद्दल सांगायचे झाले तर भाजपवाले हे भविष्यवाणी करणारे आहेत. त्यांची भविष्यवाणी खोटी निघत आहे. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यांच्या भविष्यवाणीला अर्थ नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची भविष्यवाणी सुरूच आहे. आम्ही दोन वर्ष पूर्ण केले. आघाडी सरकार पाच वर्ष चालेल.

नागपूरची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपकडून आमच्याकडे प्रस्ताव आला नाही. त्यामुळे नागपूरच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आलाच नाही. त्यामुळे आता त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. जागा कुणाकडे अधिक आहेत. नंबर कुणाकडे आहेत याला या निवडणुकीत काही अर्थ नाही, असेही यावेळी पटोले यांनी सांगितले.

You might also like