काँग्रेसच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण ; अर्थसंकल्पीय अधिवेशनातील उपस्थितीने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. फक्त सर्वसामान्य जनताच नसून राज्यातील मंत्री सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील, राजेश टोपे आणि एकनाथ खडसे यांच्या नंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.

विजय वडेट्टीवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई येथे असून आज कोरोनाचे लक्षण दिसल्याने मी कोविडची चाचणी केली, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे, लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून यामध्ये विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते, या अधिवेशनात विधान भवन परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सगळेच आमदार, अधिकारी उपस्थित असतात, त्यामुळे आता वडेट्टीवारांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोनाची चाचणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like