Wednesday, February 8, 2023

दिलासा : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या स्थिर, नवे १ हजार ३३८ पाॅझिटीव्ह तर ३० जणांचा मृत्यू

- Advertisement -

सांगली | सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत असून सोमवारी रुग्णसंख्या स्थिर राहिली. चोवीस तासात 1 हजार 338 रुग्ण आढळून आले. तर 30 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1284 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 129 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 94, कडेगाव 81, खानापूर 144, पलूस 48, तासगाव 87, जत 297, कवठेमहांकाळ 78, मिरज 173, शिराळा 58 आणि वाळवा तालुक्यात 149 रुग्ण आढळले.

कोरोना संशयित रुग्णांची मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 5 हजार रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 1648 पैकी 458 बाधित तर 3352 अँन्टीजेन चाचणीमध्ये 922 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1338 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 30 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 2 आणि मिरज शहर 2, वाळवा तालुक्यातील 12, खानापूर 4, तासगाव व जत प्रत्येकी 3, कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी केवळ 1284 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.

- Advertisement -

महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ सोमवारी पुन्हा कमी झाली. नव्याने 129 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 84 तर मिरज शहरात 45 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 94, कडेगाव 81, खानापूर 144, पलूस 48, तासगाव 87, जत 297, कवठेमहांकाळ 78, मिरज 173, शिराळा 58 आणि वाळवा तालुक्यात 149 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 20, सोलापूर 3, कर्नाटक 16, सातारा जिल्ह्यातील 2 व पुणे येथील एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 92 हजार 92 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 678 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 72 हजार 422 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 16 हजार 992 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 13 हजार 622 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.