हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन। मुंबई पुणे महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनर पलटी होऊन थेट रिक्षाला धडक दिली आहे. आज (1 फेब्रुवारी 2022) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र साठे मिसळजवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. आणि 15 ते 20 फूट दूर फरफटत गेला. या अपघातात कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली ज्यामुळे रिक्षाचा चेंदामेंदा झाला.
या अपघातात रिक्षामध्ये असलेल्या तीन महिला आणि रिक्षा चालक जखमी झाले आहेत. जखमींवर लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कंटेनर चालक सुखरूप बचावला आहे.