Monday, February 6, 2023

मथुरानगर भागात 4 वर्षापासून दूषित पाण्याचा पुरवठा; मनपाचे दुर्लक्ष

- Advertisement -

औरंगाबाद | शहरातील सिडको एन-6 भागातील मथुरानगर येथील संभाजी काॅलनी जी सेक्टर, ई सेक्टर भागातील नागरीकांना गेल्या 4 वर्षापासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. संपूर्ण गल्लीला दूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या संदर्भात तेथील स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन वार्ड अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला कळवले. मात्र मनपाने ड्रेनेज लाईनचे काम व्यवस्थित केले नाही. महिनाभरात ड्रेनेजचे पाणी नळाद्वारे येत होते. ड्रेनेजचे दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी नळाद्वारे येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापूर्वी जे काम करण्यात आले ते बोगस स्वरूपाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आणि हे बोगस काम करणार यावर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

या भागातील ड्रेनेजलाईन ही वारंवार भरत असते ही ड्रेनेजलाईन आणि वार्डाला जलपुरवठा करणारी जलवाहीनी ही आजुबाजुलाच असल्याने या ड्रेनेजलाईन मधील तुबलेले दुर्गंधीयुक्त घाण पाणी हे जलवाहीच्या आत जाऊन संपूर्ण वार्डाला घाण आणि दुषीत पाणी येत असल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. म्हणून ड्रेनेजलाईनचे काम लवकर करावे आणि पाण्याची समस्या मनपा प्रशासनाने तात्काळ सोडवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली. मागणी पूर्ण न झाल्यास स्थानीक नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.