Wednesday, October 5, 2022

Buy now

ठेकेदाराने मजुराची डोके आपटून केली हत्या; कारण वाचून व्हाल थक्क

औरंगाबाद – कामाचे पैसे मागितले म्हणून ठेकेदाराने अमानुषपणे मजुराला मारहाण करुन त्याचे डोके जमिनीवर आपटले. त्यात गंभीर जखमी झालेल्या शौकत अब्बास शहा यांचा शनिवारी मृत्यू झाला. गुरूवारी संध्याकाळी सहा वाजता पीरबाजारात हि घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष दगडु अंभोरे व राजु नाना केदारे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली.

शौकत हे वीस वर्षांपासून उस्मानपुऱ्यातील खलील पटेल यांच्या ट्रॅक्टर वर चालक हाेते. कामाच्या मागणीनुसार शौकत ट्रॅक्टर घेऊन जायचे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून ते पटेल यांचे ट्रक्टर घेवुन कबीर नगर येथील ठेकेदार सुभास दगडु अंभोरे यांना माती नेऊन देण्याचे काम करत होते. प्रत्येक आठवड्याला कामाचे पैसे देण्याचे ठरले होते. 10 मार्च रोजी शौकत अंभोरे यांच्याकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांच्यात वाद झाले. अंभोरे यांनी कामाचे पैसे न देता शिवीगाऴ करुन मारहाण सुरू केली. फायटरने मारहाण करुन त्यांना रस्त्यावर आपटले. सोबतच्या राजु केदारे ने देखील मारहाण केली. यात शौकत यांच्या डोके व चेहऱ्याला गंभीर इजा झाली. हा प्रकार त्यांच्या मुलाला कळाल्यानंतर त्याने धाव घेत घाटी रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शी भगवान सोनाजी गायकवाड यांनी घडलेला सर्व प्रकार मुलाला सांगितला. शौकत यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अंभोरे, केदारेसह अन्य एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू त्याच्या काही तासातच शौकत यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

त्यानंतर पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तत्काळ दोघांचा शोध सुरू केला. शनिवारी संध्याकाळी बागवडे, उपनिरीक्षक प्रविण वाघ, विनोद अबुज यांनी दोघांना अटक केली. तर तीसऱ्याचा शोध सुरू होता.