धर्मांतर प्रकरण : ATS ने कोर्टात दाखल केलेल्या रिमांड अर्जामध्ये झाले धक्कादायक खुलासे, ISI शी देखील कनेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । उत्तर प्रदेशात अवैधरित्या धर्म परिवर्तन (Illegal conversion) प्रकरणाच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. वास्तविक हा खुलासा या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने कोर्टात दिलेल्या अर्जावरून झाला आहे. आरोपी उमर गौतम आणि जहांगीर यांना रिमांडवर घेण्यासाठी हा अर्ज देण्यात आला होता. UP-ATS च्या तपासणीनंतर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड अर्जात सांगण्यात आले आहे की,”आरोपींकडून धर्मांतरणाचे रजिस्टर जप्त केले गेले आहे.”

एवढेच नव्हे तर मोबाईल डिटेल्सवरूनही मोठी माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील लोकसंख्येचे संतुलन बदलण्याचा कट रचला जात आहे. यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सह परदेशी संस्थांद्वारे अर्थसहाय्य दिले जात आहे. इतकेच नाही तर आरोपींनी धर्मांतर करणाऱ्या लोकांच्या मनात त्यांच्या मूळ धर्माबाबत द्वेष पसरवल्याचेही या रिमांड अर्जात म्हटले गेले आहे. याद्वारे देशातील वातावरण खराब करण्याचा त्यांचा डाव होता.

अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या धर्मांतरांच्या रजिस्टरवर चौकशी केली जाईल, असे अर्जात म्हटले गेले आहे. जप्त केलेल्या मोबाइलच्या डिटेल्सवरूनही अशी माहिती मिळाली आहे की, विदेशी एजन्सींच्या सूचना आणि फ़ंडींगच्या आधारे परदेशी गुप्तचर संस्था ISI देशाच्या लोकसंख्येचे संतुलन वेगाने बदलत आहे. धर्मांतर करणाऱ्या लोकांच्या मनात त्यांच्या मूळ धर्माविषयी द्वेष पसरवून त्यांना कट्टरपंथीय केले जात आहेत. अशी लोकं आपापसात द्वेष पसरवून देशाचे वातावरण खराब करीत आहेत, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांततेची परिस्थिती बिघडण्याची चिन्हे निर्माण होत आहेत.

अटकेनंतर UP-ATS ला उमर गौतम आणि जहांगीरसाठी 7 दिवसांचा रिमांड मिळाला आहे. पोलिसांनी सांगितले की,” या दोघांनी आतापर्यंत गरीब महिला, मूक बधिर, गरीब मुले आणि अपंग लोकांसह स्मरे 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतर केले आहे. ATS च्या म्हणण्यानुसार उमर आणि जहांगीर केवळ आमिषनेच नव्हे तर धमकी देऊनही धर्मांतर करवून घेत असत. या व्यतिरिक्त, हे लोक धर्मांतरित लोकांच्या मनात त्यांच्या मूळ धर्माबद्दल देखील द्वेष भरत असत.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment