तिरुपतीत २१ पुजाऱ्यांसहित १५८ कर्मचाऱ्यांना कोरोना, मंदिर बंद करण्याचा विचार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिरुपती मंदिरात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने पसरत आहे. तिरुमाला तिरुपति देवस्थानच्या २१ पुजाऱ्यांना कोरोना झाला आहे. एका पुजाऱ्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याना चेन्नई च्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत तिरुपतीमध्ये १५८ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. या मध्ये दोन वरिष्ठ पुरोहित/ संस्था प्रमुख समाविष्ट आहेत.पेद्दा जियार स्वामी आणि चिन्ना जियार स्वामी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे आता तिरुमाला तिरुपति देवस्थान बंद करण्याचा विचार केला जातो आहे.

१५८ कर्मचारी कोरोनाबाधित झालेले असताना मंदिर दर्शनासाठी खुले करावे की नाही यावर विचार होतो आहे. एका पोलीस अहवालात तिरुपती च्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर तात्काळ बंद करण्याचा सल्ला दिला आहे. तिरुपती मध्ये एकूण १०० पुजारी आहेत, त्यातील २१ पुजाऱ्यांना संक्रमण झाले आहे. बऱ्याच स्तरातील कर्मचाऱ्यांमध्ये देखील संक्रमण होते आहे. यामध्ये पोटू कर्मचारी आणि APSP सुरक्षा कर्मचारी यांच्यामध्ये अधिक संक्रमण दिसून येते आहे. स्थानिक प्रशासनाचे देखील मंदिर खुले राहिल्याने संक्रमण होत असल्याचे म्हणणे आहे. प्रशासनाने परिस्थिती हातातून जाण्याआधी लवकरात लवकर पावले उचलली जातील असे म्हंटले आहे.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या बाबतीत देशात रोज नवीन रेकॉर्ड होत आहेत. देशात आज मागच्या २४ तासात देशात ३४,८८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान ६७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेश मधील रुग्णसंख्या ४०,६४६ इतकी झाली आहे. मागच्या २४ तासात राज्यात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आता एकूण मृतांची संख्या ५३४ इतकी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment