हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Corona Cases In India। भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मागील २४ तासांत देशभरात कोरोना रुग्णसंख्येने ५००० हजारांचा आकडा पार केला आहे. खास करून केरळ, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्ली सारख्या महत्वाच्या राज्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे. यादरम्यान, गेल्या २४ तासांत एकूण ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चिंता आणि घबराटीचे वातावरण आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर मग लवकरच तोंडाला मास्क लावणं सक्तीचे होऊ शकतं.
वृद्ध व्यक्तींनी कोरोनापासून विशेष धोका?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी, ६ जून रोजी भारतात सक्रिय कोविड रुग्णांची (Corona Cases In India) संख्या ५,००० च्या पुढे गेली आहे, गेल्या २४ तासांत ४९८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ७६४ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर २४ तासांत एकूण ४ जणांचा दुर्दैवाने मृत्यू सुद्धा झाला आहे. यामध्ये केरळ मधील २, पंजाब आणि कर्नाटकातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे मृत पावलेल्या या चारही कोरोना रुग्णाचे वय ६० वर्षापेक्षा जास्त होते. म्हणजेच काय तर वृद्ध व्यक्तींनी कोरोनापासून विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
कोणत्या राज्यात किती रुग्ण आहेत? Corona Cases In India
देशात सर्वाधिक १,६७९ कोरोना रुग्णांची संख्या केरळ मध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्र १,२७६, गुजरात ६१५, पश्चिम बंगालमध्ये ५९६ आणि दिल्लीमध्ये ५९२ कोरोना रुग्ण आहेत. मागील २४ तासांत देशभरात कोरोना संसर्गाचे ४९८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात केरळमध्ये १९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८ आणि दिल्लीमध्ये ३० कोरोना रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे ११४ नवीन रुग्ण आढळले-
आपल्या महाराष्ट्रात कोरोनाचे ११४ नवीन रुग्ण आढळले (Corona Cases In India) आहेत. यापैकी सर्वाधिक 37 रुग्ण मुंबईत आढळले. त्यानंतर पुणे महापालिकेत 42, ठाणे महापालिकेत 1, नवी मुंबई 4, मीरा भाईंदर महापालिकेत 7, कल्याण डोबिवली 3, पुणे जिल्हा 2, पिंपरी चिंचवडमध्ये 6, सातारा 1, कोल्हापूर मनपाणा, सांगली मनपा 1, छत्रपती संभाजीनगर 1 आणि परभणी महापालिकेत 1 कोरोना रुग्ण सापडला. सध्या राज्यात एकूण 577 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. या वर्षी जानेवारीपासून एकूण रुग्णांची संख्या १,२७६ झाली आहे. यापैकी 681 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.