गोंदवलेत निलमताई गोऱ्हे यांनी पू्र्तता करूनही कोरोना सेंटर सुरू नाही ः संजय भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गोंदवले येथे कोरोना रुग्णांसाठी लवकरात लवकर सेंटर उभारुन कोणाच्याही कोबड्याने का दिवस उगवेना रुग्णांना दिलासा मिळण्यातचं आमचे खरे समाधान आहे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी एक महिन्यापूर्वीच कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी पैशाची पूर्तता करूनही सुरू झाले नाही. तेव्हा आमच्यासाठी ही लढाई श्रेयवादाची नाही व तशी वेळ देखील आताची नसल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी सांगितले.

संजय भोसले म्हणाले, ब्रम्हचैतन्य देवस्थान गोंदवलेचे चैतन्य रुग्णालयामध्ये कोरोना सेंटर सुरु करणेसाठी ते हस्तांतरीत करत प्रसंगी विरोधकांकडून अनेक नाट्यमय प्रसंग आणि राजकीय डावपेच रचले गेले. या सर्वांना बाजूला सारत विधानपरिषधेच्या उपसभापती निलताई गोर्‍हे यांनी मध्यस्थी करत, मला गोंदवले येथे जाऊन सदरील रुग्णालय देवस्थानचे ट्रस्टी विश्रामजी पाठक आणि माण तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांचे समक्ष व साक्षीने हस्तांतरी करुन देत जाहीर करणेस सांगितले होते. त्याक्षणी सदरील रुग्णालय निलमताई गोऱ्हे यांच्या प्रयत्नातून कोविडसाठी सुसज्ज व बेड, उपकरणांसहित शासनास एप्रिल २०२१ मध्ये सुपुर्द करणेत आले होते.

कोरोनाचा कहर सुरु असताना, जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून शंभर कोटींचा निधी उपलब्ध असताना व प्रशासनाकडे पैशांची कमतरता नसताना, सदरील सेंटरसाठी फक्त डाॅक्टर्स, नर्स व कर्मचारी नेमण्यास परवानगी देण्यासाठी मे महिना का उजाडावा? हे या बिकट काळात अपेक्षितच नाही. मी प्रत्यक्ष, फोनद्वारे, वेळप्रसंगी अनेक प्रसार माध्यमांमधूनही कोरोना सेंटर सुरु करणेत होत असलेल्या दिरंगाई बाबत प्रांत, तहसिलदार आणि आरोग्य अधिकार्‍यांना वेळोवेळी विचारणा केली. तसेच वेळप्रसंगी वर्तमानपत्रांमधून जाहीर आवाहन देखील केले असल्याचे संजय भोसले यांनी सांगितले.

एका राजकीय नेत्यासाठी पायघड्या घातल्या, अधिकाऱ्यांची वर्तणूक निंदनीय व अशोभणीय

प्रशासनाकडून याबाबतची सारवासारव करताना डीसीएचसी सुरु करत असलेच व आॅक्सीजन पाईप वाढविण्यासाठीच्या परवानग्यांसाठी अवधी लागत असलेचे प्रमुख कारणे सांगण्यात आली.
अनेक जीवांना आॅक्सीजन बेडची आणि उपचारांची गरज असताना, अनेक रुग्ण बेडसाडी तडफडत आहेत. जिल्हा व तालुक्याचे अधिकारी जनतेचा पैसा त्यांच्या हातात असताना, रुग्णालय तयार ताब्यात आहे. तरीही कोरोना सेंटर का सुरु करत नाहीत व विलंब का केला जात होता. यासाठी राजकीय डाळ शिजत होती हे काही बातम्या व प्रसंगावरुन स्पष्ट होत आहे. एका राजकीय नेत्यासाठी पायघड्या घातल्या जात होत्या का असा प्रश्नही जनतेतूनही विचारला जातो आहे. तसेच हे आता लपून राहीले नसून शासकीय अधिकार्‍यांची अशी वागणून हा चर्चेचा भाग बनला असून, माण प्रशासनातील अधिकार्‍यांची हि वर्तणूक निंदनीय व अशोभणीय असल्याचेही संजय भोसले यांनी सांगितले.

Leave a Comment