Monday, February 6, 2023

दिलासादायक ! औरंगाबाद शहरात कोरोनाची कमालीची घट

- Advertisement -

औरंगाबाद : शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आता कमी प्रमाणात होत आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ११३ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. यात ग्रामीणमध्ये ९३ तर शहरात केवळ १९ कोरोनाबाधित आढळले आहे. औरंगाबाद शहरात झपाट्याने कमी झालेली रुग्णसंख्या ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. यामुळे शहर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे असेच म्हणावे लागेल.

बघा जिल्ह्यातील कालची आकडेवारी
औरंगाबाद जिल्ह्यात दि.११ रोजी १७५ जणांना (मनपा ६७, ग्रामीण १०८) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १३९२१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दि.११ रोजी एकूण ११३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४४४८६ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३३२२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

- Advertisement -

मनपा (१९)
घाटी ५, नवजीवन कॉलनी १, हर्सूल १, उस्मानपूरा १, स्वराज नगर १, ज्योती नगर १, अन्य ८

ग्रामीण (९४)
गदाना ता.खुल्ताबाद १,सांजोळ ता.फुलंब्री १, भांडगाव ता.खुल्ताबाद १, कसाबखेडा, ता.खुल्ताबाद १, शिरसमाळ ता.औरंगाबाद १, दौलताबाद ता.औरंगाबाद १, अन्य ८८

मृत्यू (०९)
घाटी (०६)
१. स्त्री/६०/वडनेर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
२. पुरूष/६४/पिशोर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
३. स्त्री/६५/चिकलठाणा, औरंगाबाद.
४. स्त्री/७६/शांतीपूरा, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद.
५. पुरूष/६५/सितानाईक तांडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
६. पुरूष/६५/सटाणा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय (१)
१. पुरूष/७०/ दोनवाडा, ता. औरंगाबाद

खासगी रुग्णालय (२)
१. पुरूष/५८/भावसिंगपूरा, औरंगाबाद.
२. पुरूष/ ३९/ गोळेगाव, ता. सिल्लोड