राज्यात मागील २४ तासात ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या दारूचा खप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी तळीरामांची दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. तळीरामांच्या या दारूवेडामुळे दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. महाराष्ट्रात दारूविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या १०,८२२ एवढी आहे, यातली ३,५४३ दारूची दुकानं सुरू झाली होती. कंटेनमेन्ट झोन वगळता रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्य सरकारने दारूविक्रीला परवानगी दिली होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार सोमवारी दारूविक्री सुरू झाल्यानंतर मंगळवारपर्यंत राज्यात अंदाजे ६२.५५ कोटी रुपयांची दारूविक्री झाली. मंगळवारपर्यंत अंदाजे १६.१० लाख लीटर दारूची विक्री झाली. सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये दारूविक्रीला सुरुवात करण्यात आली. तर ९ जिल्ह्यांमध्ये दारूविक्री सुरू झाली नाही. प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यामुळे लातूर आणि उस्मानाबादमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तळीरामांच्या याच गर्दीमुळे मुंबईतील दारूविक्री थांबवण्यात आली आहे.

मात्र , दारूच्या दुकानाबाहेर होणारी गर्दी जास्त दिवस राहणार नाही, आज किंवा उद्यापर्यंत ही गर्दी संपेल असा विश्वास राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे. जिथे गर्दी होईल तिथली दुकानं काही काळासाठी बंद करण्याची कारवाई स्थानिक प्रशासन करत आहे. त्यामुळे नियम पाळले नाहीत तर दारूची दुकानं बंद होतील हे लक्षात घेऊन ग्राहकांनी शिस्त पाळावी असं आवाहन उमप यांनी केलं आहे. तसंच गर्दी टाळण्यासाठी दुकानांनी टोकन द्यावे अशा सूचना देण्यात येणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment