कोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी स्टंट : प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या कामाचे कौतुक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी फिरकी घेतली. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिल आहे. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात उपाययोजना करायच्या सोडल्या राज्य सरकार स्वतःच बातम्या पेरून पब्लिसिटी स्टंट करण्याचं काम करत असल्याच दरेकरांनी म्हंटल आहे.

सध्याच्या कोरोना काळात राज्य सरकार अजूनही उपाययोजना आखण्यात कमी पडत असल्याची माहिती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांना दिली. यावेळी ते म्हणाले,’ सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाच्या उपाययोजनांचा व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवाराच उडालेला आहे. अशा कोरोनाच्या कठीण काळात उपाययोजना आखण्याऐवजी राज्य सरकार स्वतःचीच पाठ थोपटत आहे. पंतप्रधानांनी केलेली कौतुकाची प्रेसनोट हि मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेली आहे. पंतप्रधान कार्यालयातून आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारच कौतुक करण्यासारखं आम्हाला काहीच वाटत नाही.

 

वास्तविक पाहता हे राज्य सरकार पब्लिसिटी स्टंट करण्यावरच जास्त भर देत आहे. एखादी पीआर एजन्सी नेमायचे. त्यामार्फत सरकारवर बातम्या पेरायच्या आणि स्वतःच कौतुक करून घेण्याचं काम करायचं.  जनतेला आता कळू लागले आहे कि या सरकारच्या बातम्या पेरलेल्या आहेत. प्रत्यक्षात केंद्र सरकारने कोरोना काळात बरेच काम करण्यासारखे दिले आहे. म्हणूनच आज या ठिकाणी आरोग्य व्यवस्था टिकून राहिली आहे.

You might also like