चिंताजनक! यवतमाळ आणि अमरावतीमध्ये आढळून आले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या आठवड्याभरापासून राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यांतल्या प्रमुख शहरांत तसंच ग्रामीण भागांत देखील कोरोना हातपाय पसरत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल राज्य शासनाला सातत्यानं प्रश्न विचारले जात आहेत. मात्र आता याबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात आढळला आहे. यवतमाळ आणि अमरावतीमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत.

“अमरावतीमध्ये ४ रुग्णामध्ये एक E484k म्हणून स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्पाईक प्रोटीनचा स्ट्रेन आहे. इंग्लंड आणि ब्राझीलच्या स्ट्रेनशी तो मिळताजुळता आहे. या स्ट्रेनची प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते किंवा तो अधिक वेगाने पसरतो. अमरावतीमधल्या 4 रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे.” अशी माहिती कोरोना टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. शशांक जोशी (Shashank Joshi) यांनी दिली आहे.

“अकोला जिल्ह्यामध्ये या स्ट्रेनचा जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यवतमाळमध्ये N444 हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अजूनही तरी आपल्या व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटने याबाबतची सविस्तर माहिती दिलेली नाहीय. पण या स्ट्रेनमधून होणारा कोव्हिड आणि नॉर्मल कोव्हिड यामध्ये जास्त फरक नसेल”, असं डॉ. शशांक जोशी म्हणाले. हा नवा स्ट्रेन अधिक वेगात फैलावू शकतो. त्यामुळे येत्या काळात शासनाला मिनी कन्टेन्मेट तसंच मायक्रो कन्टेन्मेट झोन करावे लागतील आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. त्याच अनुषंगाने अकोल्यात रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असंही डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलं.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment