कोरोनावर रामदेवबाबांचा रामबाण उपाय ; 3 दिवसात रुग्ण होणार बरा??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून सर्वसामान्य माणसांची चिंता वाढली आहे. दरम्यान, योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी कोरोनावर रामबाण उपाय (Medicine for Coronavirus) शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले आहेत. शुक्रवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली.

या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. बाबा रामदेव यांनी अशी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर (COVID-19) उपचार होतील. त्यांनी असा दावा केला आहे की आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे.

याआधी रामदेव बाबांनी कोरोनिलला केवळ रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीचे बुस्टर म्हटले होते. आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP – WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे. पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील.

यावेळी रामदेव बाबांनी असे म्हटले की, ‘आज ऐतिहासिक दिवस आहे. एव्हिडन्स मेडिसीन्स म्हणून एव्हिडन्स आधारित संशोधन आहे.’ त्यांनी असे म्हटले की वैद्यकीय क्षेत्रात भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment