कोरोना पेशंटचे हाॅस्पिटलमध्ये मंगळसूत्र महिला नर्सने चोरल्याचे उघड

कराड गुन्हे प्रकटीकरण विभागाचा तपास

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कोविड हाॅस्पिटलमधून 65 वर्षीय वृद्धेचे 65 हजार रूपये किंमतीचे चोरीस गेलेले मंगळसूत्र कराड गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिलेस परत मिळवून दिले आहे. रूग्णांचे मंगळसूत्र हे हाॅस्पिटलमधील महिला नर्सने चोरलेले असल्याचे उघड झाले आहे.

कराड शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी कराड येथील कोविड हाॅस्पीटलमधून एका 65 वर्षीय महिलेचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे रक्कम 65 हजार रुपये किंमतीचे चोरीस गेले होते. याबाबतची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कराड शहर पोलिस ठाण्यात अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने तपासाची चक्रे फिरवली. हॉस्पिटल प्रशासनाच्या मदतीने काही लोकांकडे तपासही केला. कराड गुन्हे प्रकटीकरण विभागाने यावेळी योग्यरित्या तपास करून मूळ चोरट्या व्यक्तींपर्यंत पोहोचले, आणि चोरीस गेलेले मंगळसूत्र संबंधित महिलेस परत मिळवून दिले.

सदरची कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.रणजीत पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, जयसिंग राजगे, नितीन येवले, तानाजी शिंदे, संजय जाधव, मारुती लाटणे, विनोद माने, आनंदा जाधव, प्रफुल्ल गाडे यांनी केली.

You might also like