सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 153 वर, दिवसभरात 8 नवीन रुग्ण…

सोलापूर प्रतिनिधी । आज दिवसभरात सोलापुरात कोरोनाचे आठ नवीन रुग्ण सापडले आहेत. सोलापुरातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या आज 153 झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना मुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या दहा झाली असून त्यामध्ये पाच पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.

यामध्ये सोलापुरातील एकता नगर परिसरातील सत्तावन्न वर्षे कोरोनाबाधित पुरुषाचा आज मृत्यू झाला आहे. आज नव्याने सापडलेले आठ रुग्ण हे सोलापुर शहरातीलच आहेत. सदर बझार लष्कर परिसरातील दोन पुरुष, साईबाबा चौकातील एक पुरुष, आज मयत झालेला एकता नगर परिसरातील एक पुरुष, मोदी परिसरातील दोन पुरुष, राहुल गांधी झोपडपट्टी परिसरातील एक पुरुष आणि सिद्धेश्वर पेठेतील एक पुरुष अशा आठ जणांचा समावेश आहे.

 रुग्णालयात उपचार घेऊन कोरोना वर मात केलेले 24 जण असून उर्वरित 119 जणांवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात कोरोनाचे 197 रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 189 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. आठ रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. अद्यापही 264 जाण्याचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

You might also like