Wednesday, February 1, 2023

धक्कादायक ! कोरोनाबाधित बापाने घेतला ९ वर्षाच्या मुलाचा जीव

- Advertisement -

पाटणा : वृत्तसंस्था – आपले आई वडिलांचे आपल्या मुलांवर खूप प्रेम असते. आपल्या मुलांना जरा जरी लागले तरी आईवडिलांना खूप त्रास होतो. पण नुकतीच बाप आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत एका बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या मुलाच्या छातीवर चढून त्याचा जीव घेतला. हि घटना मुलाच्या बहिणीच्या डोळ्यांसमोर घडल्याने तिने आरडाओरड केला तेव्हा लोक जमा झाले आणि पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. हि घटना बिहारच्या पाटणामधील कंकडबाग ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्या ९ वर्षाच्या मुलाचे नाव नितेश असे आहे. सख्या बापाने दारूच्या नशेत आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतला आहे. नितेशची बहीण मानवीने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

काय आहे प्रकरण
नितेश आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेला होता रात्रभर तो घरी आला नाही. तो घरी न आल्याने त्याचे वडील खूप रागात होते. त्यानंतर पहाटे ४ वाजता तो घरी आला. त्यानंतर राग अनावर झालेल्या वडिलांनी त्याचे हातपाय बांधून त्याला जबर मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही ते मुलाच्या छातीवर चढले आणि जोपर्यंत नितेशचा जीव जात नाही तोपर्यंत छातीवर उभे राहिले. यानंतर बहिणीने नितेशला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठालाच नाही. त्यानंतर मानवीच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी आरोपीला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

अटक केल्यानंतर समजलं, की आरोपी कोरोना पॉझिटिव्ह
पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली तेव्हा तो आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. हे समजताच पोलीस ठाण्यात एकच गोधळ उडाला. यानंतर ज्या पोलिसांनी आरोपीला अटक केली त्या पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले.

पत्नीचासुद्धा घेतला जीव
पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता आरोपीची तीन लग्न झाली असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या पत्नीचं नाव अनिता असून ती खगडियामध्ये राहते. तर दुसरी पत्नी शांतीचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीची तिसरी पत्नी मन्तोषी सध्या आरोपीसोबत राहत आहे. मृत नितेश आणि मानवी हे दुसरी पत्नी शांतीची मुले आहेत. मानवीने आपली आई शांतीचासुद्धा खून केल्याचा आरोप आपल्या वडिलांवर केला आहे.