कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्या झाल्या मालामाल; रोज किती कमाई करतात जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना महामारी एकीकडे जगासाठी विनाशकारी ठरत असतानाच लस कंपन्यांसाठी मात्र ती वरदान ठरली आहे. संकटात सापडलेल्या फार्मा क्षेत्रासाठी कोरोनाने संजीवनीचे काम केले. विशेषतः कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्या मालामाल झाल्या आहेत. कोविड लस बनवणार्‍या तीन कंपन्या – Pfizer, BioNTech आणि Moderna प्रत्येक सेकंदाला US $ 1,000 म्हणजेच 75 हजार रुपये कमवत आहेत. दररोज या कंपन्या $9.35 कोटी (सुमारे सात अब्ज रुपये) कमावत आहेत.

या चार कंपन्यांनी – Moderna, Pfizer, BioNTech आणि Johnson & Johnson यांनी जगातील दोन तृतीयांश लसींची विक्री केली आहे. ओमिक्रॉनच्या नावावर Modernaआणि Pfizer ने सुमारे दहा दिवसांत बूस्टर डोसमधून 70 हजार कोटींची कमाई केली. एस्ट्राझेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सन आता ही लस नफ्यात विकण्याचा विचार करत आहेत.

तोट्यातील कंपन्या नफ्यात बदलल्या
कोरोनापूर्वी, Moderna 3750 कोटी रुपयांच्या तोट्यात चालू होती, 2021 मध्ये तोटा संपला आणि 70 कोटी डॉलर्सचा नफा झाला. त्याचप्रमाणे 300 कोटींच्या तोट्यात असलेली बायोएनटेक वर्षभरानंतर 61 हजार कोटींच्या नफ्यात आली. त्याच वेळी, फायझरचा नफा 2020 मध्ये $80 कोटी होता, जो 2021 मध्ये $9 हजार कोटी झाला. म्हणजेच नफ्यात 124 टक्क्यांची झेप.

लाइव्ह मिंटच्या रिपोर्ट्स नुसार, 2020-21 मध्ये, सीरम इन्स्टिट्यूटने 7499 रुपयांच्या व्यवसायावर 3,890 कोटी रुपयांचा नफा कमावला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (सप्टेंबर, 2021) कंपनीचे परिचालन उत्पन्न 13,288 कोटी रुपयांवर पोहोचले.

टॉप 20 कंपन्यांमध्ये 18 फार्मा
देशात, 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री करून नफा कमावणाऱ्या टॉप 20 कंपन्यांमध्ये 18 कंपन्या फार्मा क्षेत्रातील आहेत. सीरम नंतर मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्सचा क्रमांक लागतो, ज्याचा निव्वळ नफा 28 टक्के आहे. भारतातील लस कंपनी सीरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक बनली आहे, मात्र नफ्यात ती मागे आहे.

एका लसीवर तीस पट नफा
गार्डियनच्या रिपोर्ट्स नुसार, फायझरच्या एका लसीची किंमत एक डॉलर आहे, तर एक डोस $ 30 मध्ये विकला जातो. Moderna सुद्धा आपली लस तीसपेक्षा जास्त पटीने विकते. ऑक्सफॅमच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कंपन्या आपली लस 5 पट पेक्षा जास्त नफ्यावर विकत आहेत. आता दोन्ही कंपन्या ही लस 124 डॉलरला विकणार आहेत.

कोरोना लसीनंतर कंपन्यांचा नफा
कंपनी –     2020                  2021
मॉडर्ना –    3750 कोटी      + 700 कोटी डॉलर
फायझर –  800 कोटी        + 9000 कोटी डॉलर
जॉन्सन –   97000 कोटी    +120 हजार कोटी
बायोटेक – 300 कोटी        + 61 हजार कोटी
सीरम-      2251 कोटी      + 3,890 कोटी

स्रोत: पीव्हीए, लाइव्ह मिंट

Leave a Comment