Good News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली | केवळ दिल्लीतच नव्हे तर संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. आज दिल्ली येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना हर्शवर्धम बोलत होते.

दिल्लीत ज्याप्रमाणे कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे तशीच ती संपुर्ण भारतात मोफत दिली जाणार काय असा प्रश्न विचारला असता हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस सर्व भारतीयांना मोफत मिळणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, कोरोनाची लस केव्हा येणार तसेच लसीची किंमत काय असणार याबाबत सर्व सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम होता. मात्र आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावर गुड न्युज दिली आहे.

You might also like