Sunday, May 28, 2023

देशात कोरोनाचा कहर सुरूच; एकाच दिवसात 900 हुन आधिक जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच असून मागील 24 तासात देशात 1 लाख 68 हजार 912 इतके नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात वेगाने करोना फोफावतो आहे. नवीन वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मुळं आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 इतकी झाली आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात 904 जणांचा करणामुळे मृत्यू झालाय. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान मागील चोवीस तासात एकूण 75,086 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 21 लाख 56 हजार 529 एवढी झाली आहे. देशातील सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या 12,01,009 इतकी आहे. तर देशात आतापर्यंत 1 लाख 70 हजार 179 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशात लसीकरणाने दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत देशात 10 कोटी 45 लाख 28 हजार 565 जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group