Thursday, March 30, 2023

कोरोना महाराष्ट्रात दाखल? नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिल आहे. या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली असून त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांआधी चीनहून भारतात परतलेले ३ रुग्ण केरळमध्ये होते ते बरे झाल्याची बातमी समोर येताच देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर देशात कोरोना संशयित रुग्णांची संख्या आता ७ झाली आहे.

- Advertisement -

आता नाशिकच्या रुग्णाचे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्णांची नोंद होणार. असं घडल्यास राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सतर्क राहून खबरदारी घ्यावी लागेल. सध्या नाशिकच्या या रुग्णावर उपचार सुरु कऱण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसला न घाबरण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरु नये यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून दिला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.