कोरोनाने पालकाचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांची शालेय शुल्क होणार माफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | काही दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठने कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांची फीस माफ करण्याचा निर्णय घेतला होता. आता कोरोनाने अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची शालेय फीस माफ करण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी सर्व माध्यमाच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित खासगी शाळा, जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळांचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या 23 जुलै रोजी झालेल्या स्थायी समिती महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. दोन्ही पालकांचे कोरोनाने निधन झाल्याने अनेक मुले अनाथ झाली आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून अशा मुलांच्या नावे 5 लाख रुपयांची एफडी करून त्यांना मदत दिली जात आहे.

ज्या मुलांच्या एका पालकांची निधन झाले आहे त्यांना दरमहा 1100 रुपये दिले जात आहेत. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे खाजगी शाळा दरमहा 2 हजार रुपये फी घेतात. तसेच इतर खर्चही वेगळा आहे. त्यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची सूचना खाजगी शाळांना द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली होती. तसेच या बाबतचा ठरावही मांडला होता. या ठरावाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी विविध चव्हाण यांनी सर्व शाळांना पत्र काढले आहे.

Leave a Comment