ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विक्रम, दर 16 पैकी एक व्यक्ती आहे कोविड पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन । इंग्लंडमध्ये कोरोनाची प्रकरणे विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. गेल्या महिन्यात कोविड-19 चा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत, प्रत्येक 16 पैकी एक व्यक्ती म्हणजेच लोकांना 6.37 टक्के दराने संसर्ग झाल्याचे आढळून आले. हा दर फेब्रुवारीमध्ये नोंदलेल्या संसर्गाच्या दुप्पट आहे.

या नवीन अभ्यासातून असे आढळून आले आहे की, फेब्रुवारीमध्ये प्रत्येक 35 लोकांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी एक व्यक्ती कोविड संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. ब्रिटनमधील इंपीरियल कॉलेज लंडनने दीर्घ ‘रिअल-टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन (रिअ‍ॅक्ट-1)’ च्या विश्लेषणात असे आढळून आले की, दर 30 दिवसांनी संसर्ग दर दुप्पट होतो.

या अभ्यासाच्या देखरेख डेटानुसार, संसर्गाची बहुतेक प्रकरणे ओमिक्रॉनच्या BA.2 ‘स्टिल्थ व्हेरिएंट’मधून आली आहेत. हा अभ्यास 8 ते 31 मार्च दरम्यान सुमारे 1.10 लाख नमुन्यांवर आधारित आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रोफेसर पॉल एलियट म्हणाले की,” एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा ट्रेंड चिंताजनक आहे.”

काळजी घेण्याचे आवाहन
इम्पीरियल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे रिस्पॉन्स प्रोग्राम डायरेक्टर पॉल एलियट म्हणाले, “देशातील निर्बंध संपले आहेत, मात्र मी लोकांना आवाहन करेन की संसर्गास असुरक्षित असलेल्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी काळजीपूर्वक वागावे.”

जपानने भारताच्या स्वदेशी कोवॅक्सिनला दिली मान्यता
भारताची स्वदेशी कोविड-19 लस भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनला जपानने मान्यता दिली आहे. जपानमधील भारतीय दूतावासाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,” ज्यांना ही लस मिळाली आहे ते 10 एप्रिलपासून जपानला जाऊ शकतील.” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांनी मार्च 2022 आणि सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या क्वाड समिटमध्ये विशेषतः कोविड-19 लसीच्या बाबतीत सकारात्मक आणि रचनात्मक कार्यसूचीला पाठिंबा दिला.

Leave a Comment