कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच नियोजन सुरु : अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. सर्वत्र लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबविली जात आहे. पुणे इथे वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ” राज्यात कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र काही भयंकर आजारही पसरत आहेत. त्या आजारावरील उपचारांबाबत राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने नियोजनही सुरु केलं आहे. लसीच्या खरेदीसाठी आता लवकर निविदा काढणार असल्याचीही माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तविल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत असलेले नियोजन याबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी ते म्हणाले, ” राज्य सरकारकडून ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत उपाय योजना करण्याचे काम युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्याची १२०० मेट्रिक टनची तयारी आहे. ती अजून १८०० मेट्रिकटनानाने वाढवायची आहे. यावर प्रशासनाकडून दिवसरात्र काम केले जात आहे.

ग्लोबल टेंडरच्याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “वास्तविक पाहता मुंबई महापालिकेने जे ग्लोबल टेंडर काढलं आहे. अशा प्रकारचं ग्लोबल टेंडर काढायला राज्य सरकार परवानगी देत नाही. अशा प्रकारचे टेंडर पुणे महापालिकाही काढू शकते. या ठिकाणीही महापालिकेने ग्लोबल टेंडर काढायला हरकत नाही.” भारत बायोटेकच्याबाबत ते म्हणाले, ” भारत बायोटेकने पुणे जिल्ह्यात सुमारे २८ एकर जमीन मागितली आहे. त्या कंपनीला जमीन देण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आलेल्या आहेत.या कंपनीला आपला प्रकल्प सुरु करण्यास अजून तीन महिने लागणार आहेत. या ठिकाणी तयार करण्यात येणारी लस हि अर्धी केंद्राला द्यावी लागणार आहे. तर बाकी राहिलेले लस हि राज्यासाठी घेतली जाईल, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.

Leave a Comment