कोरोना व्हायरसमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ, पहा काय म्हणतायत मंगला बनसोडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना व्हायरस चा प्रादुर्भावामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या तमाशा मंडळांवर कर्ज काढून आपल्या ताफ्यातील कलावंतांना जेवण घालण्याची वेळ आली आहे. शिमग्या पासून महाराष्ट्रातल्या गावोगावच्या यात्रांना सुरुवात होते. मात्र कोरोना मुळे प्रसिद्ध देवस्थान तसेच गावोगावच्या गर्दीच्या यात्रा रद्द झाल्याने मोठ्या तमाशा मंडळांसह लहान तमाशा मंडळाचा लाखो रुपयाच्या यात्रांच्या सुपार्‍या रद्द झाल्या आहेत. यामुळे तमाशा कलावंत हतबल झाला असून शासनाने तमाशा कलावंतांना तातडीची मदत करावी अशी मागणी प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे करवडीकर यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर तसेच कला अंगी असणाऱ्या लोकांनी तमाशाच्या माध्यमातून लोककला जपली असून हा वर्ग तमाशाच्या माध्यमातुन रोजगार मिळवतो. मार्च ते मे असे तीन महिने तमाशा मंडळात काम करून स्वतःची आर्थिक परिस्थिती सावरणारे अनेक लोक तमाशा मधून काम करतात. मात्र यंदा कोरोना वायरसच्या पार्दुभावा मुळे गावोगावच्या यात्रांसह प्रमुख देवस्थानांच्या यात्रा रद्द झाल्याने या तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून आर्थिक टंचाईचा सामना करणाऱ्या तमाशा कलावंतांना नोटबंदी, निवडणूक आचारसहिता, पूर व आता कोरोना च्या संकटाने आर्थिक फटका दिला आहे.

होळीपासून महाराष्ट्रातल्या प्रमुख देवस्थानांसह गावोगावच्या यात्रा-जत्रांना सुरुवात होते. यात्रांचा खरा हंगाम पाडव्यापासून सुरू होतो. मात्र याची सुपार्‍या अगोदरपासून घेतल्या जातात. मात्र यंदा कोरोनामुळे घेतलेल्या सुपाऱ्या गावकऱ्यांनी रद्द केल्या असून यामुळे तमाशा वरच पोट असणाऱ्या या कलावंतांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर मोठ्या तमाशा मालकांचे लाखोंचे नुसकान झाले असून आपल्या फडातील शंभर सव्वाशे कलावंतांना कर्जाऊ रक्कम घेऊन जेवण घालण्याचे वेळ त्याच्यावर आली आहे. कोरोना संकट नेमकं कधी संपेल हे अनिश्चित असून सरकारने तमाशा कलावंतांना तातडीची मदत करण्याची मागणी तमाशा कलावंत व फंड मालक मंगला बनसोडे करवडीकर यांनी केला आहे.

पहा व्हिडीओ रिपोर्ट –

Coronavirus Impact | तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ | मंगला बनसोडे | Mangala Bansode | Tamasha Fad

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा

Leave a Comment