लॉकडाउनमध्ये कंडोमचा खप खरंच वाढला का? जाणून घ्या खरं काय ते..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । जगभरात लॉकडाउनमुळे नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे कंडोमच्या विक्रीत वाढ होत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरू होती. कंडोम विक्रीत वाढ झाल्याचा हा दावा खरा आहे का? याचा आढावा घेताना समोर आलेली माहिती नक्कीच या प्रश्नाचं खरं उत्तर देणारी आहे. जवळपास दिड  महिन्यांआधी जगभरात कोरोना लॉकडाउनची सुरुवात करण्यात आली. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरच्या काही दिवसांत कंडोमची विक्री जोमात सुरू असून बाजारात तुटवडा निर्माण झाला असल्याचे वृत्त समोर आले होते. पण खरं तर या बातमीच्या खोलात पडताळणी केल्यास हा दावा चुकीचा असल्याचं दिसते. कारण कोरोनाला लॉकडाऊनचा फटका कंडोम विक्रीला सुद्धा बसला आहे.

या गोष्टीवर प्रकाश टाकत जगातील सर्वाधिक कंडोमचे विक्रमी उत्पादन करणाऱ्या कॉरेक्स बीएचडी कंपनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाउनमुळे निरोधच उत्पादन ठप्प झाले होते. लॉकडाउनमुळे मलेशियातील तीन कंपन्यांमधील निरोधचे उत्पादन थांबवावे लागले असल्याची माहिती कंपनीने दिली. जगभरात बाजारात विकला जाणारा प्रत्येक पाचवा कंडोम हा मलेशियन कंपनी कॉरेक्स बीएचडीचा असतो.

ब्रिटनची आघाडीची कंडोम उत्पादन कंपनी ड्युरेक्सने सांगितले की, जगभरातील सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कडक नियमांमुळे कंडोमच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट झाली. जगभरातील लोक आयसोलेशनमध्ये असून करोनाच्या भीतीमुळे सेक्स करण्याचे टाळत आहे. रेकिट बेनक्सिरचे सीईओ लक्ष्मण नरसिंहन यांनी सांगितले की, कंडोम विक्री मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरीक सोशल डिस्टेंसिंगचेही पालन करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सेक्स करण्याचे अनेकजण टाळत आहेत.

नरसिंहन यांनी पुढे सांगितले की, युरोपमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र झालेल्या इटलीतही अनेकांनी एकमेकांपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. अनेकजणांनी सेक्स करण्याचे टाळल्यामुळे कंडोम विक्रीत घट झाली. लॉकडाउन नियमांच्या कठोर नियमांमुळे इटली आणि ब्रिटनमधील अनेकांनी कॅज्युअल सेक्स करण्यासही नकार दिला. स्वत: च्या घरातील व्यक्तींशिवाय इतर व्यक्तींना भेटणे हे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा या दोन्ही देशांमध्ये नियम आहे. ब्रिटनमध्ये सेक्स करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. ब्रिटनमध्ये २३ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सेक्स करण्याचे अनेक जणांनी टाळले आहे.

मात्र, लैगिक भूक शमवण्यासाठी एक नवीन पर्याय याच काळात समोर आला आहे तो म्हणजे सायबर अफेअरचा. युरोप ते अमेरिकेपासून अनेक जणांनी सायबर अफेअरवर लक्ष केंद्रीत केले असल्याची बाब समोर आली आहे. अमेरिकेत लोकांना घरात राहण्याचे आदेश आहेत. त्यामुळे अनेकजणांनी ऑनलाइन डेटिंग साइटवर आपल्या पार्टनरशिवाय इतरांसह व्हर्चुअल सेक्सला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment