Saturday, March 25, 2023

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारच्या दारात, २४ तासात ५९७ नवीन रुग्ण

- Advertisement -

मुंबई । महाराष्ट्रात करोनाचा कहर कायम आहे. राज्यात आज करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली आहे. चिंतेची बात म्हणजे राज्यात काल करोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला होता तर आज ३२ रुग्ण दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज करोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ९ हजार ९१५ झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आज एकाच दिवसात २०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ५९३ रुग्णांनी करोनाला हरवण्यात यश मिळवले आहे. हा आकडा वाढावा म्हणून आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.

- Advertisement -

तसेच राज्यात ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईत २६, पुणे शहरात ३, सोलापूरमध्ये १ औरंगाबादमध्ये १ आणि पनवेलमध्ये १ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये २५ पुरुष तर ७ महिला आहेत. ३२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे १७ रुग्ण आहेत. तर १५ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले आहेत.