चिंताजनक! राज्यात दिवसभरात ३५० नवे कोरोनाग्रस्त, एकुण आकडा २६८४ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात नवीन ३५० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या २६८४ कोरोनाग्रस्त आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक १७५६ कोरोना रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. त्याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात ३१० कोरोना रुग्ण आहेत. तर नागपूर मनपा क्षेत्रात ३९ कोरोना बाधित आहेत. तसेच ठाणे ९६, नवी मुंबई ६३, कल्याण डोंबिवली ५० कोरोनाबाधित आहेत.

दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत १७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत ११२ जणांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे तर पुण्यात ३८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय ताजी आकडेवारी पाहण्यासाठी खालील ट्विटर लिंकवर क्लिक करा

Leave a Comment