Monday, February 6, 2023

‘या’ देशात चीनपेक्षा जास्त वेगाने पसरतोय कोरोना! २४ तासात सापडले ३५९० रुग्न

- Advertisement -

रोम वृत्तसंस्था | रविवारचा दिवस युरोपसाठी चिंता वाढवणारा ठरला आहे. कोरोना व्हायरसने आपला मोर्चा आता चीनवरुन युरोपकडे वळवला आहे. मागील २४ तासांत एकट्या इटलीत कोरोनाचे ३५९० रुग्न सापडल्याने खळबळ उडाली आहे. यावरुन इटलीमध्ये कोरोना व्हायरस चीनपेक्षा जास्त वेगाने पसरत असल्याचे दिसून आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार इटलीत एकट्या रविवारी कोरोनाचे ३५९० नवे रुग्न सापडले. तसेच इटलीत रविवारी कोरोनामुळे ३६८ जणांचा मृत्यू झाला. जाॅन हाॅपकिन्स युनिवर्सिटीच्या रिपोर्टनुसार चीनपेक्षा युरोपात कोरोना जास्त वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान नवीन आकडेवारीनुसार आता जगभरात कोरोनामुळे एकुण ६ हजारहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच इराण आणि स्पेन मध्येही कोरिना वेगाने पसरताना दिसत आहे. इराणमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १३९३८ झाला आहे. तर स्पेनमध्ये ७७९८ कोरोनाबाधिक रुग्न आढळून आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’

डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा