वर्ल्ड बँकेचा भारताला मदतीचा हात; ७५०० कोटींचा निधी केला मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं असतानाच देशातही कोरोना व्हायरस फोफावत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून अनेक उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तसेच या उपाययोजनांसाठी मदत करण्याचं आवाहनही देशातील नागरिकांना करण्यात येत आहे. अशातच कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला १ अब्ज डॉलर म्हणजे तब्ब्ल ७५०० कोटींच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीसाठी मंजुरी दिली आहे. वर्ल्ड बँकेच्या सहाय्यता योजनेतून १.९ अब्ज डॉलरच्या पहिल्या टप्प्यात जगभरातील २५ देशांची मदत केली जाणार आहे. तसेच, ४० पेक्षा जास्त देशांमध्ये नवीन उपक्रमांची आखणी करण्यात येणार आहे.

वर्ल्ड बँकेकडून देण्यात येणाऱ्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून सर्वाधिक निधी म्हणजेच, एक अब्ज भारताला देण्यात येणार आहे. वर्ल्ड बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जगभरातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे. यावेळी बोलताना सांगितले की, ‘भारतात १ अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून कोरोनावर मात करण्यासाठी चांगले स्क्रीनिंग, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत मिळेल.’

दरम्यान, कोरोना व्हायरसने जगभरासह देशातही हाहाकार माजवला आहे. जगभरात कोरोनामुळे दहा लाखांहून अधिक जण कोरोनाग्रस्त आहेत. तर ५१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या २५४३ वर पोहोचली आहे. त्यापैकी १७९ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

Leave a Comment