कोविड योध्ये कोरोनाच्या विळख्यात! मागील २४ तासांत राज्यात ४८५ पोलीस कोरोनाबाधित

मुंबई । देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ४८५ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून, एका पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १८ हजार ८९० वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार ७२९ जण, कोरोनामुक्त झालेले १४ हजार ९७५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १८६ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १८ हजार ८९० कोरोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ५० अधिकारी व १६ हजार ८४० कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या ३ हजार ७२९ पोलिसांमध्ये ४६१ अधिकारी व ३ हजार २६८ कर्मचारी आहेत. कोरोनामुक्त झालेल्या १४ हजार ९७५ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ५७३ व १३ हजार ४०२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १८६ पोलिसांमध्ये १६ अधिकारी व १७० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com