खा. सुप्रिया सुळेंची कोरोना आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती, म्हणाल्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील कोरोना महामारीच्या सावटात संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. सुप्रिया सुळे यांनी कोरोना आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती करत केंद्रातील मोदी सरकारला घेरले.

त्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले की, सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही. जगभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मुद्द्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, केंद्र सरकार अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या समस्येविषयी फार काही बोलताना दिसत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

लोकसभेतील १७ खासदारांना कोरोनाचा संसर्ग
आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार असून त्यांची संख्या बारा आहे. वायएसआर काँग्रेसच्या 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment