‘या’ राज्यात शाळा सुरु करणे पडले महागात; २६२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । आंध्र प्रदेशमध्ये नववी, दहावीच्या शाळा भरत आहेत. मात्र चारच दिवसात शाळा प्रत्यक्ष उघडल्यानंतर तब्बल २६२ विद्यार्थ्यांना आणि १६० शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये २ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रत्यक्ष भरण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून गेल्या तीन दिवसांत २६२ विद्यार्थ्यांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. ‘मात्र ही आकडेवारी खबरदारीची नव्हे कारण जितक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहात आहेत, त्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी आहे. तहीरी कोविड-१९ सुरक्षेसंदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत,’ असे शालेय शिक्षण आयुक्त व्ही. चिन्ना वीरभद्रुदू म्हणाले.

बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली. २६२ विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली. मात्र, हे प्रमाण ०.१ टक्का इतकं देखील नाही. म्हणूनच ही मुलं शाळा उघडल्यामुळे बाधित झाली असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक शाळेच्या वर्गात केवळ १५ ते १६ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.

शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ९.७५ लाख विद्यार्थ्यांनी नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी नोंदणी केली. यापैकी ३.९३ लाख विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती लावली. यातील १.११ लाख शिक्षक होते. १.११ लाख शिक्षकांपैकी १६० करोना पॉझिटिव्ह झाले. विद्यार्थी आणि शिक्षक दोहोंचे आयुष्य आमच्यासाठी मोलाचे आहे. असं वीरभद्रुदु म्हणाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment