करोनापासून स्वतःला वाचवायचंय, तर ‘या’ गोष्टी नक्कीच करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाविरुद्धची लढाई आता एका निर्णयक टप्प्यावर आली आहे. आणि या टप्प्यावर आपल्याला पूर्ण क्षमतेने या कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच राहण्याची गरज आहे. मात्र, घरी राहून सुद्धा तुम्हाला काही गोष्टींमध्ये अतिदक्षता पाळायची गरज आहे. जेणेकरून करोनापासून तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा बचाव करता येईल. अशाच काही गोष्टी खाली दिल्या आहेत त्यांचे नक्की पालन करा आणि करोनाला हद्दपार करण्याच्या लढाईत सामील व्हा!

१. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुउन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुआ.

२. वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.

३. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.

४. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना ‘भरपगारी’ सुट्टी देऊन टाका.

५. सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.

६. पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.

७. घरी बसलंय म्हणून बियर/ड्रिंक्स घेणे टाळा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.

८. फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुवून घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुवा आणि मगच वापरा/खा.

९. पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.

१०. चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.

११. बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.

१२. कपड्याना इस्त्री घरीच करा.

१३. सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.

१४. दरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या.

१५.आपल्याला नक्की माहीत नाहीत ते उपचार, सूचना दुसऱ्याना (व्हाट्सअप) देऊ नका.

१६. शेवटी सर्वात महत्वाचं स्वतःची काळजी घ्या! त्याचबरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या!

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment