ओमिक्रॉनसाठी मनपाचा 30 कोटींचा आराखडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना संसर्गाचा ओमिक्रॉन हा घातक विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. महापालिका प्रशासनाने पुन्हा कोरोनाचा फैलाव झालच तर उपाययोजना म्हणून 30 कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. तसा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

यासंदर्भात पांडेय यांनी सांगितले की, डिसेंबर ते मार्च 2022 पर्यंतचा चार महिन्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात मनुष्यबळ, अन्न, औषधी, उपकरणे पुरवठा, कोरोना चाचणीसाठी आवश्‍यक आरटीपीसीआर व ॲन्टीजेन किटची खरेदी, कंत्राटी मनुष्यबळ, ऑक्सिजनचा पुरवठा, रुग्णवाहिका, बायोमेडिकल वेस्टची व्यवस्था, मोफत अंत्यसंस्कार, औषधी भांडार, विद्युत देयके, कोविड सेंटरचे भाडे आदींची व्यवस्थेसाठी 30 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करून निधीची मागणी केली आहे, असे पांडेय यांनी सांगितले.

संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. यातील २० कोटी रुपये अद्याप जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे हा थकीत निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

Leave a Comment