महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावली ! पाथरीतुन ९७ मजुर मायदेशी निघाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

करमाड रेल्वे दुर्घटनेनंतर रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत सोमवारी  सकाळी परभणी जिल्ह्यातील पाथरी बस्थानकातून तालुक्यातील ९७ मजुरांना घेऊन महामंडळा च्या तीन बसेस रवाना झाल्या. यावेळी दिड महिन्याच्या लॉक डाऊन नंतर गावाकडे जाण्याचा ओडीमध्ये असणाऱ्या या मजुरांना महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावल्याची भावना निर्माण झाली होती.

 मध्यप्रदेशातील मजुरांना  त्यांच्या राज्यात सोडण्या बाबत निर्णय घेण्यात आल्यानंतर सोमवार दि.  ११ मे रोजी सकाळी ८ वाजता पाथरी बस्थानाक परिसरात मजूर जमा झाले होते. सदरील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी उपजिल्हाधिकारी व्ही. एल. कोळी , तहसीलदार एन. यु. कागणे , मानवत चे तहसीलदार फुपाटे , पोलीस निरीक्षक के .बी. बोधगिरे , आगर प्रमुख प्रशांत  पानझाडे , पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे ,यांची उपस्थिती होती.

यावेळी बस क्र .एम .एच. १३ सी. यु. ६९०३, बस क्र .एम. एच २० बी .एल.  ४०८७, आणि बस क्र .एम. एच .२० इ. एल. २४६० या व्यवस्था करण्यात आलेल्या तीन बस मधून जाणाऱ्या ९७ मजुरांच्या समुहाला ला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्या नंतर या सर्व बस एका पाठोपाठ एक पाथरी बस्थानकाच्या बाहेर पडल्या . यावेळी पाथरी ते मध्यप्रदेशातील बिजासना देवी मंदीर पर्यंत त्यांचा प्रावस असणार आहे . सोबत प्रत्येक बस मध्ये २ चालक पाठवण्यात आले असुन मजुरांना प्रशासनाच्या वतीने जाते वेळेस  नास्ता आणि पाण्याची सोय ही करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment