LinkedIn ने घेतला कर्मचारी कपातीचा निर्णय; जगभरातील 960 लोकांना बसणार झळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या प्रोफेशनल नेटवर्किंग साइट लिंक्डइनने आपल्या 960 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कंपनीने म्हटले आहे की, ते जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 6 टक्क्यांनी कमी करणार आहे. कंपनीने याबाबत असे म्हटले आहे की, जगात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे रिक्रूटमेंट प्रॉडक्ट्स ची मागणी कमी झाली आहे. लिंक्डइन वापरुन, कंपन्या या प्लॅटफॉर्मचा वापर हा कर्मचारी आणि व्यक्तींना नवीन रोजगार शोधण्यासाठी वापरतात. कंपनीचे असे म्हणणे आहे की, सेल्स आणि हायरिंग डिविजनशी संबंधित लोकांना कमी केले जाईल.

पोस्ट करून दिली माहिती
लिंक्डइनने आपल्या वेबसाइटवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली. लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन रोस्लान्स्की म्हणाले की, ज्या कर्मचार्‍यांना काढून टाकले जात आहे त्यांना 10 आठवड्यांचा पगार दिला जाईल. याशिवाय अमेरिकेतील कर्मचार्‍यांना या वर्षाच्या अखेरीस आरोग्य विम्याची सुविधा देखील उपलब्ध होईल. याद्वारे कंपनीने असे आश्वासन दिले आहे की, भविष्यात जेव्हा जेव्हा नवीन रोजगार येतील तेव्हा या लोकांना प्राधान्य दिले जाईल, ज्यांना आता कमी करण्यात आले आहे.

रोस्लान्स्की म्हणाले की आम्ही कर्मचारी कमी करत आहोत. पीडित कर्मचारी, ज्यांना अद्यापही सांगितले गेले नाही, ते कंपनीद्वारे दिले गेलेले सेल फोन, लॅपटॉप आणि अलीकडेच खरेदी केलेले उपकरणे ठेवू शकतील, जेणेकरुन करिअरमध्ये बदल करता येतील. तसेच त्यांना घरूनच काम करण्यात मदत मिळू शकेल.

लॉकडाऊनचा लिंक्डइनच्या व्यवसायावरही झाला परिणाम
ते म्हणाले की, या कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी जगभरात लॉकडाऊन लागू केले गेले आहे. अशा परिस्थितीत लिंक्डइनचा वापर या संकटात फारच कमी झाला आहे, ज्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या कालावधीत कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना कामावर घेत नाहीत, तसेच कर्मचार्‍यांना कमी करत आहेत. यामुळे लिंक्डइनच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. लिंक्डइन म्हणाले की, या रीट्रेंमेंटमुळे बाधित होणाऱ्या कंपन्यांना या आठवड्यात कळविण्यात येईल.

लिंक्डइनने प्रोफेशनल सर्कलमध्ये खूप लोकप्रियता मिळविली आहे. नवीन जॉब सर्चसाठी लोक लिंक्डइन वापरतात. लिंक्डइनची मालकी मायक्रोसॉफ्टची असून जगातील नामांकित उद्योगपती बिल गेट्स यांच्या नेतृत्वात ही कंपनी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment