COVID-19: मेच्या अखेरीस भारतात रशियन लस Sputnik-V उपलब्ध होणार, 5 कोटींहून अधिक डोस तयार केले जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr Reddys) ने मंगळवारी सांगितले की,” रशियाची कोविड -19 ची लस स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) ची पहिली खेप मे महिन्याच्या अखेरीस भारतात येण्याची अपेक्षा आहे. कंपनीला भारतीय औषध नियामकांकडून स्पुतनिक व्हीच्या मर्यादित आणीबाणीच्या वापराला परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, डॉ रेड्डी आणि रशियन डायरेक्टर इन्वेस्टमेंट फंड (RDIF) ने स्पुतनिक व्हीच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी करार केला. या लसीचे 12.5 कोटी डोस भारतात वितरित करण्याचा कंपनीला अधिकार आहे.

डॉ. रेड्डी यांच्या प्रवक्त्याने ईमेलला उत्तर देताना पीटीआय भाषेला सांगितले की, “आम्ही चालू तिमाहीत पहिली खेप आयात करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

5 कोटीहून अधिक डोस तयार केले जातील
डॉ. रेड्डीजने RDIF शी पहिल्या 10 कोटी डोस वितरणासाठीही करार केला होता. नंतर या कराराचे प्रमाण 12.5 कोटी डोसने वाढविण्यात आले. RDIF चे मुख्य कार्यकारी अधिकारी Kirill Dmitriev यांनी नुकतेच एका व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये सांगितले की,”या उन्हाळ्यात स्पुतनिक व्हीच्या लसच्या 5 कोटींपेक्षा जास्त डोस तयार होण्याची त्यांची अपेक्षा आहे.” ते म्हणाले की,”RDIF ने या लसीच्या निर्मितीसाठी 5 औषध कंपन्यांशी करार केला असून पुढील कंपन्यांशीही करार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment