लसीकरनाच्या बाबतीत अमेरिका आणि चीनला मागे टाकुन पहिल्या स्थानी भारत; 12 कोटी 26 लाखापेक्षा जास्त लोकांना टोचली लस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना साथीला पराभूत करण्यासाठी लसीकरणाचा वेग तीव्र करण्यात आला आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारताने अमेरिका आणि चीनला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. 12 दिवसांत देशात 12 कोटी 26 लाखांहून अधिक लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. अमेरिकेला हा आकडा स्पर्श करण्यासाठी 97 दिवस लागले आणि चीनने हे लक्ष्य 108 दिवसात गाठले. उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये एक कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात दररोज लसींच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी आहे.

92 व्या दिवशी सुमारे 97 लाख लस दिल्या गेल्या:

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत देशातील चार राज्यांत एक कोटींहून अधिक लसी दिल्या गेल्या आहेत. ही राज्ये महाराष्ट्र (1.21 कोटी), उत्तर प्रदेश (1.07 कोटी), राजस्थान (1.06 कोटी) आणि गुजरात (1.03 कोटी) आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लसीकरण मोहिमेच्या 92 व्या दिवशी शनिवारी देशभरात 39,998 सत्रांमध्ये 26,84,956 लसी देण्यात आल्या. यापैकी 20,22,599 लाभार्थ्यांना प्रथम लस तर 6,62,357 ला लसचा दुसरा डोस देण्यात आला.

आत्तापर्यंत 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 लसी देण्यात आल्या:

रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 18,15,325 सत्रांमध्ये एकूण 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 लसी लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. यापैकी सव्वा कोटीहून अधिक लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लाभार्थींमध्ये 91.28 लाख आरोग्य कर्मचारी (प्रथम डोस), .57.08 लाख आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस), 1.12 कोटी फ्रंटलाइन कामगार (पहिला डोस) आणि 55.10 लाख फ्रंटलाइन कामगार (दुसरा डोस) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 8.59 कोटी लोकांना प्रथम एंटी-कोरोना लस देण्यात आली आहे आणि 49.72 लाखाहून अधिक लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण लसीकरणाच्या 59.5 टक्के देशातील केवळ आठ राज्यांमध्ये देण्यात आले आहेत.

You might also like