लॉकडाऊनचे पालन करू नका! प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । केंद्रानं ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवला असून १ ऑगस्टपासून सर्वांनी दुकानं, टपऱ्या टायपिंग इन्स्टिट्यूट उघडा तसेच रिक्षावाल्यांनीसुद्धा फिरायला सुरू करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जे लॉकडाऊन आलंय त्याला मान्य करू नका. लॉकडाऊनच्या सुचना मान्य न करता आधीसारखंच जीवन सुरू करा असे देखील आंबेडकर म्हणाले.

आमचा लॉकडाऊनला पाठिंबा नाही हे दर्शवण्यासाठी ज्या झेंड्याला तुम्ही मानत असाल तो झेंडा लोकांनी घरी, गच्चीवर फडकवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. तिरंगा फडकवलात तर अधिक चांगलं होईलं असेही ते म्हणाले. असं आवाहन केल्याने माझ्यावर गुन्हा दाखल करा अटक करा, मी घाबरत नाही असेही ते म्हणाले.

जे हाल परराज्यातील कामगारांचे झाले तेच हाल लहान लहान उद्योजकांचे होत आहेत. लोकांची उपासमारीची परिस्थिती आली आहे. ८० कोटी कुटुंबांना अन्नधान देऊ म्हणले होते मात्र, ते वाटलेलं काही दिसत नसल्याचं ते म्हणाले. कोरोना संदर्भात सत्य स्थिती मांडायला राज्य किंवा केंद्र शासनाकडे राजकीय हिम्मत आणि नेतृत्व नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment