Sunday, May 28, 2023

कोवीड सेन्टरमध्ये कोरोनाबाधित रुग्णासोबत सेक्सप्रकरणी नर्सचे निलंबन; सेक्ससाठी फाडला पीपीई सूट

जकार्ता । इंडोनेशियाची राजधानी असणाऱ्या जकार्तामधील कोरोना केंद्रात असणाऱ्या व्यक्तीने येथील एका नर्ससोबत शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक खुलासा सोशल नेटवर्किंगवरुन केला. या व्यक्तीने सोशल नेटवर्किंगवर नर्स आणि आपल्यामध्ये नक्की काय काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती तसेच व्हिडीओही पोस्ट केला. त्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअप चॅटचे काही स्क्रॉनशॉर्टही या तरुणाने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत.

या व्यक्तीने केलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या दोघांची चौकशी करण्यात आली. दोघांनीही घडलेल्या प्रकरणाची कबुली दिली. जकार्तामधील विस्मा अ‍ॅटलेट करोना केंद्रातील टॉलेटमध्ये आम्ही हे कृत्य केल्याचं दोघांनाही मान्य केल्याचं द सनने दिलेल्या वृत्ता म्हटलं आहे. शरीरसंबंध ठेवण्यासाठी या महिलेने स्वत:च्या अंगावरील पीपीई सूटही फाडल्याची कबुलीही दिलीय.

संबंधित प्रकार समोर आल्यानंतर दोघांचीही करोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आलाय तर नर्स करोना निगेटीव्ह आहे. मात्र करोना हा संसर्गजन्य रोग असल्याने ड्रॉपलेट्सबरोबरच कोरनाबाधित व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवल्याने किंवा स्पर्श केल्यानेही तो पसरतो. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून या नर्सलाही आयोसेलेट करण्यात आलं आहे. हे दोघेही सध्या जकार्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत. देशातील पॉर्नोग्राफीविरोधी कायद्यानुसार या तरुणाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नर्सला तातडीने निलंबित करण्यात आलं आहे. सध्या या दोघांविरोधात चौकशी सुरु असून त्यानंतरच त्यांना काय शिक्षा होणार हे स्पष्ट केलं जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’