Saturday, June 3, 2023

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले भारताशी होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्सने या वर्षाच्या अखेरीस भारताबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. या दौर्‍यावर भारताला चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे असले तरी नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत आणखी एका कसोटी सामन्याचा समावेश होण्याचे संकेत रॉबर्ट्स यांनी दिले आहेत. बीसीसीआयशी आपले संबंध प्रबळ असल्याचे सांगत रॉबर्ट्स म्हणाले की, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची शक्यता आहे, परंतु याक्षणी काहीही निश्चित नाही आहे.

रॉबर्ट्सने व्हिडीओ कॉलद्वारे पत्रकारांना सांगितले की, “येत्या हंगामात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांबाबत निश्चितता नाही, परंतु बीसीसीआय आणि सीएचे संबंध खूप मजबूत असल्याचे मी म्हणू शकतो.

ते म्हणाले, “आम्ही भविष्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. ही गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही यासाठी वचनबद्ध आहोत. २०२३ च्या वेळापत्रक आधी आपण ते अस्तित्त्वात आणू शकतो का, हा प्रश्न आहे. होय किंवा नाही. “पुढचा हंगाम काय आहे हे आम्हाला माहित नाही, परंतु बदलत्या वातावरणात नक्कीच वेळ जवळ येईपर्यंत आम्ही ही शक्यता नाकारू शकत नाही,” असे ते म्हणाले .

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.