2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ‘या’ खेळाडूने BCCI ला सुनावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून महिला क्रिकेट टीमला दुय्यम वागणूक मिळत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या वार्षिक पगारात मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. तसेच मागील वर्षी टी20 वर्ल्ड कपचे उपविजेतेपद मिळवल्यानंतर मिळणारी बक्षिसाची रक्कम बीसीसीआयने अजूनही महिला टीमच्या सदस्यांना दिली नाही आहे. दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंड टीमची सदस्य इशा गुहा हिने बीसीसीआयच्या या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.भारतीय महिला टीमला जर पुरुष टीमच्या बरोबरीने वागणूक दिली तर त्या देखील त्यांच्या इतकीच चांगली कामगिरी करतील असा दावा इशा गुहाकडून करण्यात आला आहे. महिला क्रिकेटच्या कल्याणासाठी आणखी बरंच काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी खेळाडूंची मजबूत संघटना हवी असे मत देखील इशाने मांडले आहे.

“महिला क्रिकेटच्या विकासासाठी उपकाराच्या भावनेतून काम केले जाते. त्यांना बरोबरीचा दर्जा मिळण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. (फक्त पगाराची समानता नाही) त्याची खेळाडूंची संघटना हा महत्त्वाचा भाग आहे. भारतीय महिला टीमकडे पुरुषांच्या टीम इतकेच लक्ष दिले तर त्यांचाही दबदबा निर्माण होईल.” असे मत इशा गुहा हिने ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे.

“पुरुष खेळाडूंचा स्तर वेगळा आहे. महिला खेळाडूंच्या कल्यासाठी पायाभूत स्तरावर समानता हवी. चांगले नेटवर्क, देशांतर्गत क्रिकेटचा मजबूत पाया, कराराचा कालवाधी, मातृत्वाच्या काळात मदत तसेच निवृत्तीच्या योजनेत खेळाडू संघटना चांगले काम करु शकेल असे इशा गुहा म्हणाली. इशा गुहाने आपल्या कारकिर्दीत 8 टेस्ट, 83 वन-डे आणि 22 टी 20 मॅचमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच ती 2005 आणि 2009 साली क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडच्या टीमची सदस्य होती.

Leave a Comment