16 वर्षाच्या खेळाडूने रचला इतिहास,131 वर्षांमध्ये पहिल्यांदाच झाला ‘हा’ विश्वविक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडचा क्रिकेटपटू डॅनियल इब्राहिम याने वयाच्या 16 व्या वर्षी इंग्लिश क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.त्याने 16 वर्ष आणि 299 दिवसांचा असताना कौंटी चॅम्पियनशिपमध्ये अर्धशतक झळकावून विश्वविक्रम केला आहे. 131 वर्षांच्या कौंटी क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण बॅट्समन ठरला आहे. डॅनियल इब्राहिमने यॉर्कशर विरुद्ध बॅटींग आणि बॉलिंगमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने सुरुवातीला 134 बॉलमध्ये 55 रनची खेळी केली आणि यानंतर त्याने टॉम कॅडमोर याला आऊट करत फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिली विकेट मिळवली.

शाळेत शिकत असणाऱ्या डॅनियलने बिलाल शफायत याचा रेकॉर्ड 61 दिवसांच्या फरकाने मोडला आहे. डॅनियलच्या अगोदर बिलालने 2001 साली मिडलेक्सकडून खेळताना नॉटिंघमशरच्या विरुद्ध 72 रनची खेळी केली होती. डॅनियलला आपण ससेक्सकडून पदार्पण करणार असल्याची कोणतीही कल्पना नव्हती. आता त्याने क्रिकेट इतिहासात नव्या रेकॉर्डची नोंद केली आहे. ‘मी खेळणार असल्याचं समजल्यावर धक्का बसला होता. पण, मी खूप उत्साहित होतो. माझ्या पदार्पणासाठी हेडिंग्ले हे सर्वोत्तम मैदान होते.’ असे इब्राहिमने हा विक्रम केल्यानंतर सांगितले.

लीडसवरील ग्रुप 3 च्या या मॅचमध्ये यॉर्कशरनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. यावेळी ससेक्सची पहिली इनिंग 313 रनवर संपुष्टात आली. यामध्ये डॅनियलनं 134 बॉलमध्ये 55 धावा केल्या होत्या. ससेक्सचा कॅप्टन बेन ब्राऊन याने 127 रन काढले. डॅनियलने कॅप्टनला चांगली साथ देत टीमची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. त्या आपल्या खेळीत 8 फोर मारले होते. यानंतर यॉर्कशरने दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत 2 आऊट 273 रन काढले होते. यावेळी डेव्हिड मलान 103 आणि गॅरी बॅलन्स 74 रन काढून दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस नाबाद राहिले आहेत.

Leave a Comment