व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SA T-20 : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच एकमेकांबरोबर भिडले फॅन्स

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गुरूवारी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA T-20) यांच्यातील पहिला T -20 सामना नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात (IND vs SA T-20) दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाचा 7 विकेट्सने पराभव करत 1-0अशी आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये (IND vs SA T-20) दोन्ही टीमच्या बॅटर्सनी दमदार खेळ केला. त्याचवेळी मॅच पाहण्यासाठी अरूण जेटली स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांमध्ये वेगळाच सामना रंगला होता.

काय घडले नेमके ?
या स्टेडिअमच्या ईस्ट स्टँडमध्ये बसलेल्या काही प्रेक्षकांमध्ये सामन्यादरम्यान जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे प्रकरण चांगलंच चिघळलेलं पाहून पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत केले. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओच्या सुरूवातील दोन मुलं एका प्रेक्षकाला मारगाण करत असल्याचं दिसत आहेत. त्यानंतर आणखी दोन जण येऊन त्याच प्रेक्षकाला लाथाबुक्यांनी मारहाण करू लागतात. हि मारहाण नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, या स्टँडमधील एक प्रेक्षक जास्तच उत्साही होता. तो बहुधा पहिल्यांदाच मॅच पाहण्यासाठी आला होता. त्याने मोठा झेंडा सोबत आणला होता. त्यामुळे त्याचा अन्य प्रेक्षकांशी वाद झाला. त्यानंतर झेंडा घेऊन आलेल्या प्रेक्षकांनी मागील स्टँडमधून आणखी काही जणांना बोलावलं आणि हि मारामारी सुरु झाली.

हे पण वाचा :

शिवसेनेच्या राज्यसभेतील पराभवामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र; भाजपच्या ‘या’ खासदाराने केले मोठे विधान

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

भाजपच्या यशामुळे ‘मविआ’च्या तोंडचं पाणी पळालंय; देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल